Thursday, June 18, 2020

वाठोडे केंद्रात करण्यात आले पाठ्यपुस्तक वाटप

वाठोडे केंद्रात करण्यात आले पाठ्यपुस्तक वाटप 

          आज दिनांक 18 जून 2020 रोजी बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री आव्हाड साहेब आणि केंद्रप्रमुख कोळी साहेब यांच्या मार्गदर्शाखाली वाठोडे केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांनी पाठ्यपुस्तक वाटप केले. वाटप करतांना जेवढे शक्य होईल तेवढी पुस्तके ही शाळेतच SOCIAL DISTANCING चे नियम योग्य प्रकारे पाळत करण्यात आले. तसेच जी मुले शाळेत येऊ शकली नाही त्यांना त्यांच्या घरी जाऊन पुस्तक पोहोच करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना लर्न फ्रॉम होम योग्य मार्गदर्शन करण्यात आले. सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याची आणि शिक्षणाची योग्य ती काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. 


               पुस्तक वाटप करतानाची छायाचित्रे



No comments: