Friday, June 5, 2020

वाठोडे केंद्रात घेण्यात आली शाळा शुभारंभ आणि इतर विषयांवर मुख्याध्यापक सहविचार सभा

 वाठोडे केंद्रात घेण्यात आली शाळा शुभारंभ आणि इतर विषयांवर मुख्याध्यापक सहविचार सभा    




         आज दि. 05/06/2020 रोजी सकाळी 9:00 वा. जि. प. केंद्रशाळा वाठोडे येथे थाळनेर बीटाचे शिक्षण विस्तार अधकारी मा. श्री. आव्हाड साहेब आणि केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. कोळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ आणि इतर विषयांवर मुख्याध्यापक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. 


          सभेला येतांना सर्व शिक्षकांनी लॉक डाऊन चे नियम पाळत तोंडाला मास्क लावून आले होते. प्रशिक्षणाची बैठक व्यवस्था देखील SOCIAL DISTANCING चे नियम पाळत योग्य अंतर ठेऊन करण्यात आली होती. आलेल्या प्रत्येक शिक्षकास सॅनिटायझर देऊन  स्वछतेचे पालन करण्यात आले.


          सभेची सुरुवात ही प्रतेक शिक्षकाला स्वतः मध्ये कोरोना चे काही लक्षण दिसतात का हे विचारून करण्यात आली. आलेल्या पैकी कोणतेही शिक्षकात हे कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नाहीत याची खात्री करण्यात आली. तद्नंतर हजेरी घेऊन सभेची सुरुवात करण्यात आली. त्यात मा.श्री. आव्हाड साहेबांनी व कोळी साहेबांनी खालील विषयांवर चर्चा सत्र सुरू केले. चर्चेत खालील विषय घेण्यात आले.

     1. शाळा शुभारंभ कसा करावा? :-

          प्रथम आलेल्या सर्वांना शाळा शुभारंभ केव्हा, कसा करता येईल हा प्रश्न घेण्यात आला. मा. श्री आव्हाड साहेब यांनी सांगितले की नेहमी शाळा ही 15 जून ला सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर आपण शाळेची तयारी चालू करावी. शाळा चालू करण्यासाठी आपण शाषण निर्णय येण्याची वाट पाहू. निर्णय आल्यावर आपणास शाळा चालू कराव्या लागतील. परंतु त्या पूर्वी आपल्या केंद्रातील कोणत्या शाळा चालू करता येतील? हा प्रश्न साहेबांनी विचारला. त्या साठी  SMC ची मीटिंग घ्यावी. त्यात 15 जूनाल शाळा चालू करता येईल का ? हा विषय घ्यावा. सर्वांचे मत जाणून घ्यावे. आणि ठराव करून जो निर्णय असेल तो मंजूर करून घ्यावा. चालू करायचे असल्यास त्या कोणत्या पद्धतीने चालू करता येतील ? आणि नसल्यास काय कारणे आहेत? यांची नोंद प्रोसिडींग बुक मध्ये घ्यावी. आणि शाळा चालू न झाल्यास इतर पर्याय आणि कोणत्या उपाय योजना करता येतील ह्या विषयावर देखील चर्चा करावी, नोंद घ्यावी. शाळा सुरू करू न शकल्यास ऑनलाईन व्यवस्था करू शकतो का ? स्वयंसेवक किती मिळतील? टीव्ही, मोबाईल , लाऊड स्पीकर, आणि इतर साधने उपलब्धता किती आणि कशी ? या विषयी देखील चर्चा करावी. 

      २. दाखल पात्र विद्यार्थी :-

      प्रत्येक गावात आणि शाळेत दाखल पात्र विद्यार्थी किती या विषयी आढावा घेण्यात आला आणि त्यांना दाखल करण्यासाठी सांगण्यात आले. प्रत्येक्षात दाखल करावे किंवा ऑनलाईन पद्धतीने त्यांना दाखल करावे. त्यासाठी दिलेली गूगल फॉर्म ची लिंक भरावी. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थी दाखल होतील याची काळजी घ्यावी. कोणताही मुलगा/मुलगी  शाळाबाह्य राहणार नाही याची काळजी घ्यावी. दाखल पात्र विद्यार्थी रजिस्टर अद्ययावत ठेवावे. 


     3. पाठ्य पुस्तक वाटप :-

         लवकरच सर्व शाळांना पाठ्यपुस्तक मिळणार आहेत. ते मिळाल्यावर व्यवस्थित रित्या सोशल डिस्टंसिंग चे पालन करून प्रत्येक मुलास ते 15 जून पर्यंत वाटप करावेत. जेणे करून लर्न फ्रॉम होम करतांना कोणत्याही मुलाला अडचण येणार नाही. 

   4. शाळा चालू करण्याआधी :-

    आपल्या केंद्रातील कोणत्या शाळा ह्या विलागिकरणा साठी देण्यात आल्या आहेत का याचा आढावा घेतला. तसेच कोण कोणत्या शाळा ह्या पावसाळ्यात गळतात याचा आढावा देखील घेतला. तसेच शाळा सुरू करण्याआधी प्रत्येक शाळा ही निर्जंतुक करण्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायतीस लेखी पत्र द्यावे. आपण देखील लक्ष ठेवावे. शाळा सॅनिटायझर ने निर्जंतुक करून घ्यावी. जेणे करून मुलांची काळजी घेतली जाईल. शाळा स्वच्छ करावी. तसेच पालकांचे, मुलांचे समुपदेशन करावे , कोरोना विषयी जनजागृती करावी. शाळा सुरू होण्याआधी प्रत्येक शाळेत हॅन्डवॉश , साबण,  पाणी यांची व्यवस्था करून ठेवावी. आणि ही व्यवस्था कायमस्वरूपी ठेवावी. 


     5. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वाटप:- 

    ज्या शाळांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यांनी ती लवकरात लवकर वाटप करावी. वाटप करताना ती मुलांच्या बँकेच्या खात्यात जमा करावी. कोणीही  शिष्यवृत्ती ही हातात देऊ नये किंवा साधा  चेक देऊ नये अन्यथा हा दाखल पात्र गुन्हा होईल आणि आपल्यावर कार्यवाही करण्यात येईल.  चेक हा क्रॉस चेकच द्यावा किंवा खाते जमा होईल असाच द्यावा. ज्या शाळांना शिष्यवृत्ती मिळाली नसेल त्यांनी लेखी अर्ज कार्यालयात जमा करावेत. पाठपुरावा करावा. 


     6. आधार कार्ड माहिती. :- 

    आता पर्यंत कोणत्या शाळेचे किती मुलांचे आधार कार्ड नोंदणी ही सरल मध्ये करण्यात आली आहे याचा आढावा घेतला. तसेच ज्यांचे बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर राहिलेल्या मुलांची सराल ला आधार कार्ड नोंद करावी. ज्या मुलांची आधार नोंद सरल ला झालेली नसेल त्या मुलांना संच मान्यतेसाठी गृहीत धरले जाणार नाही. त्या मुळे आपला पट सरल ला कमी दिसेल आणि संच मान्यता ही कमी मुलांची होईल त्यास सर्वस्वी शाळाच जबाबदार राहील. 

    7. मुख्यालय सोडू नये :-

    कोणीही आपले मुख्यालय सोडू नये. या काळात जर कोणीही मुख्यालय सोडले तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. 

     8. अनुदान खर्च:- 

      शाळेला मिळणारे अनुदान योग्य त्या कामासाठी वापरावे. मिळालेले अनुदान हे ज्या कारणासाठी मिळाले असेल त्याच कारणासाठी  खर्च करावे.  हेड बाय हेड खर्च करावे. झालेल्या खर्चाची योग्य ती नोंद ठेवावी. हिशोब क्लिअर ठेवावा. रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे. 

   9.  इतर :-

     तसेच ज्या शाळांनी निकाल जाहीर केला नसेल त्यांनी लवकरात लवकर निकाल जाहीर करावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी निकाल ऑनलाईन जाहीर करावा. 
       यु-डायस+ ची माहिती चेक करून ती माहिती बरोबर भरल्याची खात्री करून लवकर  CERTIFY करावी. यु-डायस+ मध्ये जी माहिती सत्य असेल तीच सत्य परिस्थिती नोंदवावी. चुकीची माहिती नोंदवू नये. 
     जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे, पालकांचे Whatsapp ग्रुप तयार करावेत आणि त्यांच्यावर दररोज माहिती, अभ्यास तसेच ऑनलाइन कन्टेन्ट टाकत राहावे. विद्यार्थी लर्न फ्रॉम होम करू शकतील असे जास्तीत जास्त प्रयत्न करावेत.
 

    
      शेवटी केंद्रप्रमुख श्री.आर.पी.कोळी साहेब आणि थाळनेर बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. आव्हाड साहेब यांनी शिक्षकांच्या प्रश्नांचे निराकरण करून चर्चेची समाप्ती केली आणि सभा संपल्याचे घोषित केले. 


 


No comments: