जिल्हा परिषद केंद्रशाळा वाठोडे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
आज दिनांक 03 जाने.2020 रोजी जिल्हा परिषद केंद्रशाळा वाठोडे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. प्रथम सर्व मुलींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून आले. तसेच मुलांनी देखील वेशभूषा ही परिधान केली होती. नंतर गावात जयंती निमित्त पाठ्यपुस्तक व वेशभूषा दिंडी काढण्यात आली. शाळेत परत आल्यावर प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. तदनंतर श्रीमती चव्हाण मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा थोडक्यात परिचय करून दिला. नंतर श्रीम. सैंदाने मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील योगदान समजवून दिले. स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून दिले. शेवटी कार्यक्रमाची सांगता झाली.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध वेशभुषा
गावात काढण्यात आली दिंडी
No comments:
Post a Comment