वाठोडे केंद्रात घेण्यात आल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा.
वाठोडे केंद्रात दिनांक 03/01/2020 रोजी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सहभागी होत्या. स्पर्धा घेतांना विविध खेळांचा सहभाग होता. स्पर्धेत धावणे , लंगडी, लिंबू-चमचा , कबड्डी , सामान्य ज्ञान स्पर्धा सारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेसाठी आलेले सर्व विद्यार्थी हे उत्स्फूर्तपणे सहभाग घेत होते. मुलांनी स्पर्धेचा खूप आनंद घेतला. मुलांची स्पर्धा पाहून शिक्षकांना देखील खूप आनंद वाटला. शेवटी प्रथम द्वितीय क्रमांक काढणे देखील अवघड जात होते एवढी स्पर्धा ही चुरशीची होती. शेवटी जिंकणे महत्वाचे नसून स्पर्धेत सहभाग घेणे महत्वाचे असते. सहभाग घेण्याचा आनंद सर्वांनी घेतला.
धावण्याची स्पर्धेतील आनंद घेतांना विद्यार्थी
लिंबू चमचा स्पर्धेची चुरस
No comments:
Post a Comment