Friday, May 1, 2020

आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा

शाळा बंद तरी प्रवेश चालू




मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. आव्हाड साहेब, केंद्र प्रमुख श्री. कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाने व वाठोडे केंद्रातील शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना  या लॉकडाऊनच्या काळात शाळेत  सहज सुलभ प्रवेश घेता यावा यासाठी ऑनलाईन फॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. 
शाळा बंद असली तरी देखील आपण आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी त्याचा प्रवेश आजच आपल्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेत निश्चित करावा. आता आपल्याला त्यासाठी शाळेत जाण्याची गरज नाही. त्यासाठी आपण त्याचा प्रवेश ऑनलाईन देखील करू शकता.  जास्त काळजी करायची गरज नाही. फक्त खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून थोडीशी माहिती भरून आजच प्रवेश फॉर्म भरून टेन्शन मुक्त रहा.

हा फॉर्म वाठोडे केंद्रातील शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आहे.
फॉर्म भरताना अडचण आल्यास शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा.
शक्यतो गूगल क्रोम ब्राऊझर मध्ये फॉर्म भरावा.
माहिती शक्य असल्यास मराठीत भरावी.
 शक्य असल्यास फॉर्म भरताना आधार कार्ड किंवा जन्म दाखला पाहून भरावा.
फॉर्म भरल्यावर शाळा चालू झाली की शाळेस भेट द्यावी.







No comments: