वाठोडे केंद्रात घेण्यात आली कोरोना सर्वेक्षणाचे प्रशिक्षण.
आज दि. 22/04/2020 रोजी सकाळी 8:30 वा. जि. प. केंद्रशाळा वाठोडे येथे थाळनेर बीटाचे शिक्षण विस्तार अधकारी मा. श्री. आव्हाड साहेब आणि केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. कोळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना सर्वेक्षण संदर्भात मीटिंग ( प्रशिक्षण) घेण्यात आली.
मीटिंगला येतांना सर्व शिक्षकांनी लॉक डाऊन चे नियम पाळत तोंडला मास्क लावून आले होते. प्रशिक्षणाची बैठक व्यवस्था देखील SOCIAL DISTANCING चे नियम पाळत योग्य अंतर ठेऊन करण्यात आली होती.
प्रशिक्षणाची सुरुवात ही प्रतेक शिक्षकाला स्वतः मध्ये कोरोना चे काही लक्षण दिसतात का हे विचारून करण्यात आली. आलेल्या पैकी कोणतेही शिक्षकात हे कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नाहीत याची खात्री करण्यात आली. तद्नंतर हजेरी घेऊन प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. त्यात मा. श्री. आव्हाड साहेबांनी व कोळी साहेबांनी खालील बाबी विस्तार पूर्वक समजवून दिल्यात.
1. प्रथम साहेबांनी कोरोना सर्वेक्षण करणे का महत्वाचे आहे हे समजावले.
सर्वेक्षण करून कोरोना ची साखळी तोडून त्याचा प्रादुर्भाव हा आजूबाजूच्या इतर लोकांना होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे सर्वेक्षण आहे हे समजावून सांगितले. हा साथीचा रोग खूपच संसर्ग जन्य असून त्याचा प्रसार संपूर्ण जगात खूपच झपाट्याने होत आहे. आणि भरपूर लोकांचा जीव ही या रोगाने घेतला आहे. हे टाळण्यासाठी आपणही समाजाचे एक जबाबदार घटक आहोत त्यासाठी आपणास ही जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व शिक्षकांनी ही जबाबदारी घेण्यास तत्परता दाखविली.
2. सर्वेक्षण केव्हा करावे.?
सर्वेक्षण हे आपणास जेव्हा आपल्या कार्यक्षेत्रातील गावात जर एक जरी कोरोना चा रुग्ण आढळला तर हे सर्वेक्षण त्याच गावात करावे लागणार आहे. त्याचा सूचना देखील अपणाल देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही मुख्यालय सोडू नये, प्रतेक जन केंद्रप्रमुखांच्या संपर्कात राहील आणि आपला मोबाईल कायम चालू राहील याची काळजी घेण्याचे सांगितले.
3. सर्वेक्षण कोण करणार?
सर्वेक्षण करण्यासाठी प्रत्येक गावात टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम ला जास्तीत जास्त फक्त 50 घरे सोपविण्यात आली आहेत. प्रत्येक टीम मध्ये एक आरोग्य खात्यातील एक जाणकार व्यक्ती , पोलीस कर्मचारी देण्यात आलेले आहेत.
4. सर्वेक्षण कसे करणार ?
सर्वेक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या टीम ने ठरवून दिलेल्या 50 घरांचे सर्वेक्षण दररोज करायचे आहे. सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या टीम ने प्रतेक घरी प्रत्यक्ष भेट देऊन 3 फूट अंतर वरूनच माहिती गोळा करायची आहे. तेथे कोणत्याही वस्तू, साधनाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. तेथे बसू नये आणि लिखाण काम देखील दूर उभे राहून स्वतः कडचे साहित्य वापरूनच करावे. स्वतःची काळजी घेत सर्वेक्षण करावे. प्रत्येक घरातून कोणाला लक्षण दिसतात का ही विचारपूस करायची आहे. तसेच माहिती दिलेल्या नमुन्यात भरावयाची आहे. जर एखाद्यास लक्षण दिसत असतील तर त्याची नोंद घेऊन त्यास दिलेला फॉर्म भरून देऊन तपासणी साठी सूचित करावे. माहिती अचूक भरावी. कुटुंबातील प्रत्येक व्यातीची माहिती व दिसत असलेली लक्षणे यांची नोंद करावी. आणि कोणास मधुमेह, दीर्घ आजार सारखे रोग असतील तर त्याची देखील नोंद घ्यावी. जर कोणी बाहेरून आला असेल तर त्याची स्थलांतराची पूर्ण माहिती देखील भरावी लागणार आहे. भरून झालेले फॉर्म हे त्या टीमचे Supervisor कडे दररोज जमा करावाचे आहेत.
5. सर्वेक्षण किती दिवस करावे?
सर्वेक्षण हे 14 दिवस करावे लागणार आहे. दररोज प्रत्येक घरी सर्वेक्षण करून माहिती भरून ती जमा करावयाची आहे. तो पर्यंत टीमने पूर्ण 14 दिवस शाळेतच थांबून सर्वेक्षण करावे लागणार आहे. जेणे करून सर्वेक्षण करणाच्या घरी रोगाचा प्रसार होणार नाही. सर्वेक्षण करणाऱ्या टीमला सर्व सुविधा पुरविली जाणार आहे. त्यांना सर्व प्रकारचे साहित्य दिले जाणार आहे. तो पर्यंत तो परिसर संपूर्ण सिल केला जाईल. आणि त्या परिसरात कोणालाही प्रवेश असणार नाही आणि कोणालाही बाहेर जाता येणार नाही. तसेच त्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे आणि तो परिसर पूर्णपणे लॉक केला जाईल जेणे करून रोगाचा प्रसार बाहेर जाऊ नये.
अशा अनेक सूचना ह्या देण्यात आल्या.
तद्नंतर प्रत्येक गावात रेशन वाटपाचा अहवाल देण्याबाबत मार्गदर्शन केले. आणि रेशन वाटप हे POS मशीन वर होईल याची काळजी घ्यावयास सांगितले आणि वाटप सुरू केल्याचा मॅसेज आणि संपल्यावर आकडेवारी व अहवाल जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शेवटी सर्व शिक्षकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. सर्व शिक्षकांनी स्वतः ची काळजी घेऊन सर्वे करण्याची सूचना देण्यात आल्या. आणि कोरोना रोग विषयी जान जागृती करण्या संदर्भात देखील सांगण्यात आले. तद्नंतर श्री. दरबार सरांनी त्यांना दिलेल्या ठिकाणी रेशन वाटप करतांना आलेल्या अनुभवाचे वर्णन करून सर्व शिक्षकांना मदत केली
No comments:
Post a Comment