Saturday, April 4, 2020

करोना मुळे वाठोडे केंद्रात करण्यात आले धाण्यादी वाटप.

कोरोना आपत्ती मुळे वाठोडे केंद्रात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनातून तांदूळ व कडधान्याचे वाटप.



                वाठोडे केंद्रात आज दि. 04/04/2020 पर्यंत पोषण आहार  लागू असल्याल्या सर्व शाळांनी तांदूळ व डाळी यांचे वाटप करण्यात आले. वाटप करण्याचा एक दिवस अगोदरच प्रत्यक्ष थाळनेर बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री. आव्हाड साहेब व केंद्रप्रमुख मा.श्री. कोळी साहेब ह्यांनी परिसरातील पोलीस यंत्रणेची भेट घेऊन त्यांना सहकार्याची विनंती व वाटपाची जाणीव करून दिली. त्यांनीही नियमांचे पालन करून वाटपाची परवानगी दिली.
                प्रत्येक शाळेत वाटप करतांना SOCIAL DISTANCING चे पालन करत कमीत कमी 1 मीटर अंतर राहील असे विद्यार्थ्याच्या पालकांना रांगेत उभे करून त्यांना प्रथम कोरोना या रोगा विषयी जागरूकता करण्यात आली. त्यांना घ्याव्यायची काळजी समजावून सांगितले. वाटप करतांना प्रतेक शाळेने शिल्लक साठ्या चे प्रत्येक विद्यार्थ्याला सम प्रमाणात वाटप होईल याचे नियोजन अगोदरच करून ठेवले होते. त्याची जाणीव अगोदर पालकांना , SMC सदस्यांना , ग्रामस्थांना करून देण्यात आली होती. पालकांनीही सहकार्य करत शांततेत , नियमांचे पालन करून धाण्यादी घेऊन कुठेही न थांबता घरी घेले. अश्या प्रकारे गर्दी न करता , विद्यार्थ्यांना न बोलवता शासन निर्णयाचे पालन करून SOCIAL DISTANCING ठेवत धाण्यादी वाटपाचा कार्यक्रम पूर्ण झाला.
                 लॉक डाऊन मुळे पालकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यांना जेवणाची समस्या भेडसावत आहे. या धाण्यादी वाटप मुळे गरीब विद्यार्थ्यांना खरोखरच मदत मिळाली. ह्या वाटप मुळे विद्यार्थ्याचे पोषण आहार खंड पडणार नाही याची जाणीव देखील झाली.




जि.प. शाळा भोरटेक



जि.प. केन्द्रशाळा वाठोडे


जि.प. केन्द्रशाळा वाठोडे

 जि.प. शाळा थाळनेर
 जि.प. शाळा कुंभारटेक

जि.प. शाळा जमादारपाडा

जि.प. शाळा नावाडीपाडा

जि.प. शाळा दामसरपाडा

जि.प. उर्दूशाळा थाळनेर

1 comment:

Chandrakant Ahire said...

Very nice job....
With social distance