Monday, April 6, 2020

Evaluation of students. आकारिक व संकलित मूल्यमापन

विद्यार्थ्याचे मूल्यमापन कसे करावे.



                             नमस्कार मित्रांनो , कोरोणा व्हायरस मुळे इयत्ता 1ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन चाचणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता आपल्या सर्वांना चाचणी न घेताच त्यांना श्रेणी द्यावी लागणार आहे. ती कशी करावी हाच प्रश्न आता आपल्या सर्वांना भेडसावत असेल. तर पाहुया आपण श्रेणी कशी ठरवावी. 
           जसे की आपण सर्वांना माहिती आहे की आपण विद्यार्थ्याची श्रेणी त्याच्या 100 मार्क्स पैकी मिळालेल्या मार्क्स वर ठरवितो. पण आता संकलित चाचणी न झाल्याने त्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. श्रेणी ठरवताना आपण ती खालील प्रमाणे ठरवितो. 

श्रेणी तक्ता
गुणांचे वर्गांतर 91-100 81-90 71-80 61-70 51-60 41-50 33-40 21-32 20 पेक्षा कमी
श्रेणी अ-१ अ-२ ब-१ ब-२ क-१ क-२ ई-१ ई-२


             आता चाचणी ही 100 गुणांची नसल्यामुळे आपणाला चाचणीची गुण 100 पैकी करून घ्यावी लागेल. त्यासाठी आपल्याला खालील पद्धत वापरावी लागेल.
 
           एकूण मिळालेले गुण ÷ एकूण गुण ×100 = विद्यार्थ्याचे 100 पैकी गुण
                 उदा.   समजा एका विद्यार्थ्याला  आकारिक चाचणीत  59 गुण मिळाले. त्याची आकारिक चाचणीचे एकूण गुण होते 70. तर त्याला 100 पैकी
                 59
                 ----  × 100 = 84.29      गुण मिळालेत.
                 70
                   तर मग त्याची श्रेणी ही ह्या नव्या गुणांच्या आधारे करावी. त्याची श्रेणी आली  अ-2.
             या प्रमाणे आपण सर्व   विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांची श्रेणी ठरवू शकतो आणि त्याला पुढच्या  वर्गात प्रवेश देऊ शकतो.
             धन्यवाद.

No comments: