जिल्हा परिषद केंद्रशाळा वाठोडे, ता. शिरपूर जि. धुळे येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
दि. 22/01/2020 वार बुधवार रोजी जिल्हा परिषद केंद्रशाळा वाठोडे येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदचे पुष्प ८वे अतिशय नियोजनबद्ध रीतीने संपन्न झाले.
परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्या मा.सौ. भैरवीताई शिरसाठ, पं. स. सदस्य मा. श्री. विजयदादा बागुल , वाठोडे गावाचे सरपंच मा. श्री. नारायणसिंग चौधरी यांची उपस्थिती लाभली.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून थाळनेर बीटाचे शि. वि. अ. मा. श्री. आव्हाड साहेब हे होते. परिषद केंद्रप्रमुख मार. श्री. कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनखाली घेण्यात आली. यात इंग्रजीपेटी विषयी मार्गदर्शन सह इतर शैक्षणिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणेत आली.
तद्नंतर ई.२री च्या मुलामुलींनी पाठ्यपुस्तकातील let's speak ही activity सादर केली. इ. ३री व ४थी च्या मुलींनी देश रांगीला ह्या गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. व विद्यार्थ्यांना बक्षीसेही दिली. आपले मनोगत व्यक्त करताना मा. श्री. प्रेमचंददादा शिरसाठ यांनी जि. प. शाळा वाठोडे चे भौतिक वातावरण , परसबाग बघून खूप कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतही कौतुक करून पालकांचा कल जि. प.शाळांकडे कसा अधिकाधिक वळेल याकडे आपण स्वतः प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच उपस्थित मा.श्री. विजयदादा , श्री. आव्हाड साहेब , श्री. कोळी साहेब यांनी देखील भरभरून कौतुक केले व मार्गदर्शन केले.
परिषदेस केंद्रातील सर्व शिक्षक बंधु भगिनींचे अनमोल सहकार्य लाभले. शेवटी मण्यावरंच्या मान्यतेने शिक्षण परिषद संपन्न झाल्याची घोषणा करण्यात आली.
No comments:
Post a Comment