जिल्हा परिषद शाळा थाळनेर येथे घेण्यात आली शिक्षण परिषद व EVP चा कार्यक्रम
आज दिनांक 20/12/2019 रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष स्थान श्री. आव्हाड साहेब शि. वि. अ. बीट थाळनेर यांनी ग्रहण केले. तसेच परिषदेस श्री. बुवा साहेब शि. वि. अ. शिरपूर यांची उपस्थिती लाभली. परिषद केंद्रप्रमुख श्री. कोळी साहेब यांचे मार्गदर्शन खाली झाली. प्रथम सर्वांचे स्वागत सभारंभ झाले. नंतर श्री. न्याहदे सरांनी मराठी पेटीतील साहित्याची अतिशय सोप्या पद्धतीने करून दिले. तद्नंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नंतर EVP च्या कार्यक्रमाचे महत्व श्री. गणेश सरांनी पटवून दिले. आणि सर्वांकडून स्वतः च्या मतदान चे व्हेरिफिकेशन करवून घेतले. तदनंतर श्री. आव्हाड सरांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास उपस्थित श्री. बुवा साहेब यांनी शिक्षण परिषदचे महत्व पटवून सांगितले व त्यांच्या केंद्रात होणारे नवीन उपक्रमांची माहिती दिली. शेवटी केंद्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गोष्टीचा आढावा घेण्यात आला. व चर्चा करण्यात आली. सरते शेवटी अध्यक्ष यांची मजुरीचे परिषद संपन्न झाली.
शिक्षण परिषदेत चे प्रात्यक्षिक करवून घेतांना श्री गणेश सर
No comments:
Post a Comment